क्षयरोग मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वागीण प्रयत्न करा; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन



         अकोला,दि. 10 (जिमाका)- भारत सरकारने 2025 पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा क्षयरोग मुक्त करण्याकरीता क्षयरोग रुग्णांचे शोध घेवून त्याच्यांवर योग्य ते उपचार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. तसेच क्षयरोग रुग्णाला पोषक आहार घेण्याकरीता प्रत्येकी दरमहा रु. 500/- औषधोपचारापर्यंत देण्यात याव्या, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हास्तरीय टिबी फोरम सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती सावित्रीबाई राठोड, जिल्हा शल्य चिकीत्सक अधिकारी डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.  सुरेश आसोले,  मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.फारुख शेख,  जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मेघा गोळे, नर्सिग महाविद्यालयाचे प्राचार्य संगिता साने, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, डॉ. एम.एस. मोहिते व बँकेचे प्रतिनिधी आदि अधिकारी उपस्थित होते.

क्षयरोग मुक्त करण्याकरीता टीबी फोरमची स्थापना करण्यात आले असून या अंतर्गत क्षयरोग रुग्णाना प्रतीमहा रु. 500/- पोषण आहार भत्याची रक्कम शुन्य बॅलेन्सवर थेट बँकेत जमा करण्याचे निर्देश संबंधित बँक अधिकारी यांना दिले. तसेच क्षयरोग मुक्त झालेले रुग्णांनी जास्तीत जास्त क्षयरोग रुग्णांना औषध उपचार करुन हा रोग पूर्णपणे बरा होतो याकरीता प्रबोधन करण्याचेही आवाहन यावेळी जिल्हाधिकारी यांनी केले.

क्षयरोग रुग्णांना औषधोपचारासोबत पोषक आहार मुबलक प्रमाणात मिळावा यासाठी अंत्योदय योजना लागू करण्यात आली होती. त्यामुळे क्षयरोग रुग्णांना चांगला पोषक आहार  मिळून क्षयरोगावर मात करता आली आहे. क्षयरोग रुग्णांना अंत्योदय योजना लागू करणारे राज्यातील अकोला हा एकमात्र जिल्हा आहे. क्षयरोग रुग्णांना व त्यांच्या कुटुंबियाची सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करुन त्याचे योग्य पूनवर्सन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ