344 अहवाल प्राप्त; 35 पॉझिटीव्ह, 92 डिस्चार्ज

 अकोला,दि. 28 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 344 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 309 अहवाल निगेटीव्ह तर 35 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9333 (7448+1708+177) झाली आहे. आज दिवसभरात  रुग्णालयात असलेल्या 10 तर होम आयसोलेशन मध्ये असलेल्या 82 रुग्णांना घरी सोडण्यात आले,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 54053 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 52687  फेरतपासणीचे 244 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1122 नमुने होते. आजपर्यंत एकूण 53690 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 46242 तर पॉझिटीव्ह अहवाल 9333 (7448+1708+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 35 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 35 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व १८ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील विठ्ठल नगर, गोरक्षण रोड व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर व मोठी उमरी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित शिवाजी नगर, सिंधी कॅम्प, राम नगर, शास्त्री नगर, निंबा ता. मूर्तिजापूर, अकोट, चोहट्टा बाजार, प्रोफेसर कॉलनी, आपातापा रोड, गुडधी, कैलास टेकडी, काळेगाव व जीएमसी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.  तर आज सायंकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील भागवत पेठ, केशव नगर, रघुवीर नगर, घोडेगाव ता. तेल्हारा, रणपिसे नगर, राधे नगर, बोरगाव मंजू, छोटी उमरी व खिरपुरी ता. बाळापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

92 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून चार, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, बिहाडे हॉस्पिटल येथून दोन, सुर्याचंद्रा हॉस्पिटल येथून एक, तर अवघते हॉस्पिटल येथून एक तसेच होम असोलेशन येथून ८२ जणांना,  अशा एकूण ९२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

593 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9333 (7448+1708+177) आहे. त्यातील 291 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8449 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 593 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ