निवृत्तीवेतनधारकांना घरपोच जीवन प्रमाणपत्र


        अकोला, दि.6(जिमाका)- डाक विभागातर्फे निवृत्ती घेतलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी घरपोच जीवन प्रमाणपत्र(डिजीटल लाईफ सर्टिफिकेट) सुविधा देण्याची सोय केली आहे. ही सेवा आधारप्रणालीवर आधारित असून जेष्ठ नागरिकांना पोस्टमनमार्फत आधार व बोटांच्या ठस्यांच्या साहाय्याने जीवन प्रमाण क्रमांक मिळवता येईल. ही सेवा कोरोना कालावधीमध्ये जेष्ठांना घरातून बाहेर न जाता घरपोच सेवा प्राप्त होणार आहे. या सेवेसाठी निवृत्तीधारकाजवळ आधार क्रमांक, पीपीओ क्रमांक, खाते क्रमांक, पेन्शन डिपार्टमेंट हि माहिती सोबत असायला हवी. या सेवेसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येईल. ही सुविधा मिळवण्यासाठी पोस्ट इन्फो अँप डाऊनलोड करुन त्यात सर्व्हिस रिक्वेस्टमध्ये जाऊन जीवन प्रमाण या पर्यायावर क्लिक केल्यास पोस्टमन संपर्क साधून निवृत्तीधारकाच्या घरी येऊन जीवन प्रमाण काढण्यास मदत करेल. तसेच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस किवा पोस्टमन यांनाही संपर्क करता येईल. या योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रवर डाक अधीक्षक शिवशंकर लिंगायत यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ