खेलो इंडिया अंतर्गत ई- खेलो पाठशाला

                       

अकोला,दि.12(जिमाका)फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत खेलो इंडिया फिटनेस असेसमेंट फॉर स्कुल, गोईंग चिल्ड्रेन हा उपक्रम राज्यात प्रारंभ करण्यात आलेला आहे.  खेलो इंडिया क्रीडा स्पर्धाप्रमाणेच  फिट  इंडिया  मुव्हमेंट, मध्येही महाराष्ट्र राज्य हे देशातील  फिटेस्ट स्टेट ठरविण्याच्या  दृष्टीने प्रशिक्षण कार्यक्रमाची  आखणी  करण्यात आलेली आहे.

फिट इंडिया मूव्हमेंट या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी संचालक, शिक्षण विभाग (प्राथमिक  माध्यमिक)  राज्य शैक्षणीक संशोधन  प्रशिक्षण परिषद (SCERT) यांचे स्तरावरुन राज्यातील शाळांची ऑनलाईन नोंदणीची कार्यवाही  करण्यात येणार  आहे.

देशातील खेळाची संस्कृती वाढविण्याकरीता    क्रीडा शिक्षकांचे  क्रीडा मार्गदर्शक यांचे खेलो 

इंडिया अंतर्गत विविध खेळाची  पाठशाला ऑनलाईन प्रशिक्षणाची सुरवात करण्यात येत  आहे.

खेलो इंडिया खेलो पाठशाला हा शारीरिक शिक्षक (PET)  क्रीडामार्गदर्शक (COACH) यांचेसाठी   शिक्षण पाठशाला मंच तयार करण्यात आला आहे.यामध्ये शारीरिक  डिजिटल सोबत मुलांना/ खेळाडुंना  अत्युत्कृष्ट प्रशिक्षण देण्यात येणार आहे.मुलांना त्यांच्या विभाग/शाळेमध्ये मैदानावरीत प्रशिक्षणासह LMS  Platform  तयार करुन त्यांचे कुरासह  content देण्यात येईल.याशिवाय क्रीडा शिक्षक  क्रीडा  मार्गदर्शक यांना यातील योग्य मार्गदर्शन / प्रशिक्षणासाठी त्या त्या विभागातील तज्ञ देऊन त्यांचे वेळोवेळी  मूल्यमापन करण्यात येणार आहे.

या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये, क्रीडा शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक यांचा समावेश  मोठया प्रमाणात होण्यासाठी जिल्हयातील सर्व शाळांनी खेलो इंडियाच्या https://schoolfitness.kheloindia.gov.in/tot.aspx#  या संकेतस्थळावर जाऊन शाळा  क्रीडा शिक्षक यांची नोंदणीची कार्यवाही करण्यात यावी असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ