रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 169 चाचण्या, 18 पॉझिटिव्ह


अकोला,दि. 24 (जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 169 चाचण्या झाल्या त्यात 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.

            आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, अकोट येथे सात चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे सहा चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे एकाची चाचणी झाली त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, पातूर येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, तेल्हारा येथे सात चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आला, मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही,  तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 22 चाचण्या झाल्या त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला,  48 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, वैद्यकीय महाविद्यालय येथे  55  चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ला, तर हेडगेवार लॅब येथे 14 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, असे दिवसभरात 169  चाचण्यांमध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 24468 चाचण्या झाल्या त्यात 1732 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ