प्रधानमंत्री पीक विमा योजना प्रचार रथाला दाखविली जिल्हाधिकारी यांनी हिरवी झेंडी

 



        अकोला,दि.19 (जिमाका)- नैसर्गिक आपत्ती, किटकांचा प्रादुर्भाव किवा अचानक उद्धवणाऱ्या घटना यामुळे होणारे पिकाचे नुकसान व अपयश यासाठी शेतकऱ्यांना विम्यांचे संरक्षण व आर्थिक पाठबळ देण्याकरीता प्रधानमंत्री पीक विमा योजना  राबविण्यात येते. यासाठी कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासनव्दारा प्रायोजीत एचडीएफसी इर्गा या खाजगी कंपनीच्या दोन प्रचाररथाव्दारे शहरी व  ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येणार आहे.

            या प्रचाररथाला आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेची सुरुवात केली. यावेळी मनपाचे आयुक्त संजय कापडणीस, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, एचडीएफसी इर्गा कंपनीचे जिल्हा समन्वयक दिलीप सेन व सुजय निपाणे यांची उपस्थिती होती. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ