1064 अहवाल प्राप्त; 32 पॉझिटीव्ह, 75 डिस्चार्ज


अकोला,दि. 23 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1064 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1032 अहवाल निगेटीव्ह तर 32 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9061(7231+1653+177) झाली आहे, आज दिवसभरात 75 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 51782 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  50453 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1090 नमुने होते. आजपर्यंत एकूण 50974 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 43743 तर पॉझिटीव्ह अहवाल 9061(7231+1653+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 32 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 32 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 18 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात पाच महिला व 13 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील तीन जण, पातूर व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित अंधारसांवगी ता. पातूर, शिर्ला ता. पातूर, आळसी प्लॉट, स्कूल ऑफ स्कॉलर्स, पारस, शिवनी, उमरधरी ता. बार्शिटाकळी, लखमापूर ता. बार्शिटाकळी, डाबकी रोड, जीएमसी क्वॉटर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 14 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला व 12 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील समता कॉलनी येथील चार जण, गोरक्षण रोड  व कॉग्रेस नगर येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित जठारपेठ, संतोष नगर, तापडीया नगर, कमाल नगर, रामदास पेठ व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

75 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा 71 जणांना, अशा एकूण 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

468 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9061(7231+1653+177) आहे. त्यातील 288 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8305 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 468 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ