74 अहवाल प्राप्त; नऊ पॉझिटीव्ह, 36 डिस्चार्ज
अकोला,दि.2
(जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 74 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 65 अहवाल निगेटीव्ह तर नऊ
अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे काल (दि.31) रॅपिड ॲटीजेन
टेस्ट मध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता
अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 8428(6797+1454+177) झाली आहे. आज दिवसभरात 36 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत
एकूण 43331 जणांचे
नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 42183 फेरतपासणीचे 227 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 921
नमुने होते. आजपर्यंत एकूण 43161 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 36364
तर पॉझिटीव्ह अहवाल 8428(6797+1454+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आज नऊ पॉझिटिव्ह
दरम्यान आज दिवसभरात नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले. आज सकाळी नऊ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन
महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील
छोटी उमरी येथील दोन जण, तर उर्वरित गोपालखेड,
शास्त्री नगर, डाबकी रोड, लक्ष्मी नगर, अकोट फैल, जठार
पेठ व तापडिया नगर येथील प्रत्येकी एक
प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.
36 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय
महाविद्यालय येथून सात जण, कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून चार जण,
आयकॉन हॉस्पीटल येथून तीन जण, अकोला ॲक्सीडेंट
क्लिनीक येथून एक जण, बिऱ्हाडे हॉस्पीटल येथून एक जण तसेच
होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झाला अशा 20 जणांना, अशा एकूण 36 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे,
अशी माहिती जिल्हा शल्य
चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
185 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8428(6797+1454+177) आहे. त्यातील 281 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या
एकूण व्यक्तींची 79 संख्या आहे. तर
सद्यस्थितीत 185 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या
सूत्रांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा