398 अहवाल प्राप्त; 37 पॉझिटीव्ह, चार डिस्चार्ज, दोन मयत


अकोला,दि. 27 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 398 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 361 अहवाल निगेटीव्ह तर 37 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच दोघांचा मृत्यू झाला.

त्याच प्रमाणे काल (दि.26) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9290(7413+1700+177) झाली आहे, आज दिवसभरात चार रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 53630 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 52268  फेरतपासणीचे 243 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1119 नमुने होते. आजपर्यंत एकूण 53346 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 45933 तर पॉझिटीव्ह अहवाल 9290(7413+1700+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 37 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 37 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व 18 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आलेवाडी ता. अकोट व मोठी उमरी येथील तीन जण, सातव चौक, गजानन नगर व कौलखेड येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित सुधीर कॉलनी, राधे नगर, जयहिंद चौक, भागवत प्लॉट, कॉग्रेस नगर, गोरक्षण रोड, अकोली जहागीर, दहातोंडा ता. मुर्तिजापूर, महागाव, शिवणी, जीएमसी व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात चार महिला व नऊ  पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मलकापूर येथील तीन जण, रणपिसे नगर येथील दोन जण, तर उर्वरित गोपालखेड, लक्ष्मी नगर, हिंगणा फाटा, खडकी, मोठी उमरी, सिंधी कॅम्प, लहान उमरी व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

चार जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून एक जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, अशा एकूण चार जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

दोन मयत

दरम्यान आज दोन जणाचा मृत्यू झाला. त्यात बार्शीटाकळी येथील 35वर्षीय पुरुष असून तो दि. 13नोव्हेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेतांना मृत्यू झाला, तर जऊळखेड खुर्द, ता. अकोट येथील 45 वर्षीय महिला असून ती  25 नोव्हेंबर  रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला,

642 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9290(7413+1700+177) आहे. त्यातील 291 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8357 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 642 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ