अनाथ बालकांना प्रमाणपत्रासाठी विशेष पंधरवाडयाचे आयोजन

 कोला,दि.12(जिमाका) - जिल्हयातील महिला व बालविकास विभागाव्दारे मान्यता प्राप्त शासकीय /स्वयंसेवी संस्थेतील आजी/माजी प्रवेशीत पात्रता धारध अनाथ मुलांना अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्या अनुषंगाने दिनांक 14 ते 30 नोव्हेबर 2020 या कालावधीमध्ये पंधरवाडा राबविण्यात येणार आहे.

            या करिता जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात एक मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अनाथ प्रमाणपत्र संबंधित प्रस्ताव माहिला व बाल विकास विभागाव्दारे मान्यता प्राप्त शासकीय/स्वयंसेवी संस्थेतील आजी/माजी प्रवेशीत पात्रता धारक अनाथ मुलांनी संस्थेशी संपर्क करुन आपले आवश्यक कागदपत्रे संबंधीत संस्था अधिक्षकांकडे तात्काळ सादर करावे. अनाथ प्रमाणपत्राचे प्रस्ताव संबंधीत संस्था अधिक्षकांनी जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी  कार्यालय येथे सादर करावे. अनाथ प्रमाणपत्र संबंधीत प्रस्ताव सादर करुन आवश्यक त्या कागदपत्राची छाननी परीपुर्ण प्रस्ताव तयार करुन सादर करण्याची जबाबदारी मदत कक्षाकडे देण्यात आली आहे. तसेच  याबाबत काही अडी-अडचणी असल्यास जिल्हा स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबत काही माहिती आवश्यक असल्यास तसेच अडचणींचे निराकरण करण्याकरीता संबंधीत संस्थेच्या अधिक्षकांशी संपर्क साधावा असे जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ