सातवी आर्थिक गणना प्रगणकांना माहिती देण्याचे नागरिकांना जिल्हाधिकारी यांचे आवाहन


अकोला,दि. 23 (जिमाका)- जिल्ह्यामध्ये 26 नोव्हेंबर 2019 पासून सातव्या आर्थिक गणनाचे काम सामाजिक सेवा केंद्राचे प्रगणक घरोघरी जावून कुटुंबाच्याबाबतीत, औद्योगिक आस्थापना, उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना करणार आहे. यासाठी सामाजिक सेवा केंद्राव्दारे 859 प्रगणक व 219 पर्यवेक्षक नियुक्ती करण्यात आले आहे. या सर्वाना ओळखपत्र देण्यात आले असून अशा ओळखपत्र धारक प्रगणकांना माहिती देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

सदर गणना राष्ट्रीय काम म्हणून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्रगणकांना माहिती दयावी, हि माहिती पूर्णता गोपणीय राहणार आहे. देशाच्या सर्वागीण विकासासाठी व  नवीन योजना अंमलात आणण्यासाठी या माहितीचा उपयोग शासनाला होणार आहे. आर्थिक बाबीचे नियोजनाच्या दृष्टीने आर्थिक गणना महत्वाची असल्यामुळे हे काम राष्ट्रीय काम समजून सहकार्य करावे व नागरिकांनी न घाबरता प्रगणकांना माहिती दयावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्रीमती बी.आर. मोहोड व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ