खाजगी प्रवासी बसेसची विशेष तपासणी मोहिम

 


अकोला,दि. 9 (जिमाका)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे त्या संवर्गासाठी संपुर्ण बससाठी येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडेदर शासनाने निश्चित केले आहे.

            दिपावली या सणानिमित्य व उन्हाळी  सुटीसारख्या गर्दीच्या हंगामात खाजगी बस मालंकाकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति कि.मी. भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. खाजगी बस मालकांकडुन शासनाने निश्चित केलेल्या प्रति कि.मी. भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची  वेळोवेळी सातत्याने खातरजमा करण्याकरीता या प्रादेशिक परिवहन विभागाव्दारे भरारी पथके तयार करण्यात आली आहे. तसेच खाजगी वाहतुकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतुकदारांवर कडक कारवाई करण्यात येईल. वाहतुकदारांकडून जास्तीचे भाडे घेतल्यास प्रवाश्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकोला येथे रितसर तक्रार नोंदवावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ