डाळिंब व संत्रा फळपिकांचा विमा योजनेत समाविष्ट

 


अकोला,दि. 17 (जिमाका)- आंबिया बहार 2020 मध्ये डाळिंब व संत्रा पिकासाठी पुर्नरचीत हवामान आधारित फळपिक विमा योजना अकोला जिल्ह्यातील अकोला, अकोट, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर व तेल्हारा या तालुक्यातील महसूल मंडळामध्ये राबविण्यात येत आहे. सदर योजना कार्यन्वित करणारी विमा कंपनी शासनाच्या महावेध प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्र येथे  नोंदवल्या गेलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसान भरपाई देईल. जिल्ह्यामध्ये सदर योजना भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेडमार्फत कार्यन्वित केले जात आहे.

अकोला तालुक्यातील कौलखेड व शिवणी महसूल मंडळात डाळिंब पिकांचे विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर 1 लक्ष 30 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा प्रतिहेक्टर हप्ता 6 हजार 500 रुपये आहे,  अकोट तालुक्यातील अकोट, उमरा, पणज व अकोलखेड या महसूल मंडळात संत्रा पिकांचे विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर 80 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा प्रतिहेक्टर हप्ता 4 हजार रुपये आहे, पातुर तालुक्यातील पातुर, आलेगाव व बाभूळगाव महसूल मंडळात संत्रा पिकांचे विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर 80 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा प्रतिहेक्टर हप्ता 4 हजार रुपये आहे.

 बार्शिटाकळी तालुक्यातील महान महसूल मंडळात डाळिंब पिकांचे विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर 1 लक्ष 30 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा प्रतिहेक्टर हप्ता 6 हजार 500 रुपये आहे, बार्शिटाकळी तालुक्यातील राजंदा मंडळात संत्रा पिकांचे विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर 80 हजार रुपये असून  शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा प्रतिहेक्टर हप्ता 4 हजार रुपये आहे, मुर्तिजापूर तालुक्यातील कुरुम, हातगाव व निम्भा महसूल मंडळात संत्रा पिकांचे विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर 80 हजार रुपये असून  शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा प्रतिहेक्टर हप्ता 4 हजार रुपये आहे, तेल्हारा तालुक्यातील अडगाव(बु.), तेल्हारा व हिवरखेड महसूल मंडळात संत्रा पिकांचे विमा संरक्षित रक्कम प्रतिहेक्टर 80 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा प्रतिहेक्टर हप्ता 4 हजार रुपये आहे. डाळिंब पिकासाठी पिकविमाची अंतिम दिनांक 31 डिसेंबर तर संत्रा पिकांसाठी अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर आहे.

कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सदर योजना ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांना सदर योजनेत भाग घेणे अथवा न घेणेबाबत संबंधित बँकेकडे विहित नमुन्यात घोषणापत्र व अर्ज सादर करावा लागेल. अर्ज केला नसल्यास आपली संमती आहे, असे गृहित धरुन बँकेमार्फत आपला विमा हप्ता कपात करण्यात येईल. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विहित मुदतीत बँकेत किवा आपले सरकार सेवा केंद्र येथे ऑनलाईन फळपिक विमा पोर्टल वर www.pmfby.gov.in वर सहभाग नोंदवावा.  त्यासाठी अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधार नोंदणी प्रत, जमीन धारक सातबारा, आठ-अ उतारा व फळबागेचा जीओ टँगींग केलेला फोटो, भाडेपट्टी करार असलेल्या शेतकऱ्यांच्या करारनामा किवा सहमती पत्र आणि बँक पासबुकाची प्रत सादर करुन प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक साक्षांकन करणे बंधनकारक आहे.

अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी किवा भारतीय कृषि विमा कंपनीचे सपकाळ (मो क्र.7666405078) यांचेकडे संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ