आपातापा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक रद्द

 


अकोला,दि. 20(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील आपातापा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक राबविण्यात आलेल्या मतदार यादी कार्यक्रम व निवडणूक कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

कोविड-19 चा संसर्ग, निवडणूक प्रक्रीया स्थगितीतील भिन्न परिस्थिती व स्थगितीचा प्रदिर्घ काळ विचारात घेवून एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या जिल्ह्यातील आपातापा  ग्रामपंचायतीच्या 24 फेब्रुवारी 2020 रोजीचा निवडणूक कार्यक्रम व मतदार यादी कार्यक्रम रद्द करण्यात येत आहे. आपातापा ग्रामपंचायतींच्या मतदार यादी कार्यक्रम व निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहिर करण्यात येईल असे, उपजिल्हाधिकारी तथा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती शाखेचे प्रभारी अधिकारी संजय खडसे यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ