राम जाधव यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची हानी- पालकमंत्री ना. बच्चू कडू यांचा शोकसंदेश

 अकोला,दि. 30 (जिमाका)-  येथील ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. विदर्भाच्या नाट्यक्षेत्राचे ते भूषण होते, अशा शब्दात राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी रंगकर्मी राम जाधव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

आपल्या शोकसंदेशात ना. बच्चू कडू म्हणतात, येथील ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे आज सकाळी दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी  नाट्यसृष्टीची मोठी हानी झाली आहे. विदर्भाच्या नाट्यक्षेत्राचे भूषण असलेल्या राम जाधव यांनी अ. भा . मराठी नाट्य परिषदेने रत्नागिरी येथे आयोजित केलेल्या 91 व्या अ. भा. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मराठी रंगभुमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविले होते. त्यांनी अकोल्याला मिळवून दिलेला सन्मान अकोलेकर कधीही विसरू शकणार नाहीत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ