जीवनावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत कांद्यावर साठवणूक निर्बंध लागू
अकोला,दि.2 (जिमाका)- केन्द्रशासनाच्या अधिसूचनेप्रमाणे
कांद्याच्या साठवणूकीवर निर्बंध लागू करण्यात आली आहे. सदर आदेशाची अंमलबजावणी
करावी व साठेबाजी करण्याऱ्या व्यापारावर कार्यवाही करावी, अशा सूचना
केन्द्रशासनाने दिल्या आहे.
त्यानुसार राज्यशासनाने कांदाच्या
साठवणूकीवर घाऊक व्यापारासाठी 25 मेंट्रीक टन व किरकोळ व्यापारासाठी दोन मेंट्रीक
टन साठा निर्बंध 31 डिसेंबरपर्यंत लागू करण्यात येत आहे. कांदा आयातदार घाऊक किवा
किरकोळ व्यापारी किवा विक्रेता असल्यास त्यांना साठ्या निर्बंधातून सूट देण्यात
आली आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी व साठेबाजी करणाऱ्यावर
सक्त कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी
संबंधित यंत्रणेला दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा