रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 20 चाचण्या, तीन पॉझिटिव्ह
अकोला,दि. 1(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 20 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर,
मुर्तिजापूर व तेल्हारा येथे चाचण्या झाल्या नाही, तसेच अकोला मनपा, अकोला आयएमए, वैद्यकीय
कर्मचारी येथे चाचण्या झाल्या नाही, वैद्यकीय
महाविद्यालय येथे 20 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचे
अहवाल पॉझिटिव्ह आला, तर हेडगेवार लॅब येथे चाचण्या झाल्या
नाही, असे दिवसभरात 20 चाचण्यांमध्ये तीन
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आजपर्यंत 21657 चाचण्या झाल्या त्यात 1501 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा