जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत


अकोला,दि. 25 (जिमाका)- सन 2020 ते 2025 दरम्यान अकोला जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूकीव्दारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करावयाचे आहे. त्याकरीता दि. 8 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वा. तहसिलस्तरावर तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती, जमाती तसेच नागरिकांचा मागास प्रवर्गा मधील व्यक्तीकरीता सरपंचाची पदे आरक्षित करण्याकरीता आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. तसेच अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग व खुला प्रवर्गातील स्त्रीयाकरीता आरक्षणाची सोडत जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली दि. 11 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता छत्रपती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सोडत घेण्यात येणार आहे.

तहसिल कार्यालय अकोटची आरक्षण सोडत सकाळी 11.00 वाजता, तेल्हाराची सकाळी 11.30 वा., बाळापूरची दुपारी 12.00 वा, पातुरची 12.30 वा., मुर्तिजापूरची दुपारी 1.00 वा, बार्शिटाकळीची आरक्षण सोडत दुपारी 1.30 वाजता, तर अकोलाची आरक्षण सोडत दुपारी 2.00 वाजता होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी  सोडतीस उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ