498 अहवाल प्राप्त; 30 पॉझिटीव्ह, 11 डिस्चार्ज

 


अकोला,दि. 26 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 498 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 468 अहवाल निगेटीव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  9244(7376+1691+177) झाली आहे, आज दिवसभरात 11 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 53411 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 52054 फेरतपासणीचे 241 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1116 नमुने होते. आजपर्यंत एकूण 52948 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 45572 तर पॉझिटीव्ह अहवाल 9244(7376+1691+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 30 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 30 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात नऊ महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मलकापूर येथील तीन जण, सातव चौक व निमवाडी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित डाबकी रोड, लक्ष्मी नगर बोरगाव मंजू, माऊली नगर गोरक्षण रोड, मोठी उमरी, जवाहर नगर, ज्योती नगर जठारपेठ, आदर्श कॉलनी, मुक्ताई नगर, बाळापूर, तेल्हारा, गोरक्षण रोड, जठारपेठ व अंभग रेसीडेन्सी  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 10 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. त्यातील उगवा, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, छोटी उमरी, मनब्दा ता. तेल्हारा, प्रभात किड्स स्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय, रणपिसे नगर, सहकार नगर व लोकमान्य नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

11 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सहा जण, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रिजेन्सी येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक, अवघाते हॉस्पीटल येथून एक जण, अशा एकूण 11 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

602 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 9244(7376+1691+177) आहे. त्यातील 289 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8353 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 602 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ