26 अहवाल प्राप्त; तीन पॉझिटीव्ह, 13 डिस्चार्ज

 


अकोला,दि. 15 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 26 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 23 अहवाल निगेटीव्ह तर तीन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज दुपारनंतर 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आले.  

त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  8723(6982+1564+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 44785 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  43510 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1036 नमुने होते. आजपर्यंत एकूण 44658 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 37676 तर पॉझिटीव्ह अहवाल 8723(6982+1564+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज तीन पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात तीन जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन पुरुषांचा समावेश असून ते रॉयल रिजेंसी महाजन प्लॉट व टीचर कॉलनी खडकी येथील रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला असून ती मुर्तिजापूर येथील रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

13 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून सात जण, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून तीन जण, तर हॉटेल स्कायलार्क येथून तीन जण, अशा एकूण 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

302 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8723(6982+1564+177) आहे. त्यातील 283 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8138 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 302 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ