बँड पथकांना व संगीत कार्यक्रमास सशर्त परवानगी जिल्हाधिकारी यांचे आदेश


अकोला,दि. 10 (जिमाका)- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार गुरुवार दि. 12 नोव्हेंबर 2020 पासून सर्व बँड पथकांना तसेच लग्नसमारंभामध्ये संगीत कार्यक्रम सुरु करण्याबाबतचे प्रतिबंधात्मक आदेश अटी व शर्तीच्‍या अधिन राहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहे.

मिशन बिगेन अगेन अंतर्गत गुरुवार दि. 12 नोव्‍हेंबर पासून मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत.  कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये या करिता सामाजिक अंतर व इतर आवश्‍यक उपाययोजनेचा अवलंब करुन पुढील नमूद केलेल्‍या अटी व शर्तीनुसार पुढील आदेशापर्यंत सुरु करण्यास  परवानगी देत आहे.

 अटी व शर्ती : दि. 30 सप्टेंबर 2020 आदेशानुसार लग्न समारंभाच्या वेळी उपस्थित असलेल्या 50 व्यक्तींमध्ये बँड पथक व संगीत कार्यक्रम करणाऱ्या सदस्यांचा समावेश असेल, एकाच ठिकाणी गर्दी न करता सामाजिक अंतर( Social Distaneing) राखुन बँड बाजविणे, संगीत कार्यक्रम घेणे बंधनकारक राहील, बैंड पथक व संगीत कार्यक्रम या पथकातील सर्व सदस्यांचे नियमित थर्मल स्कॅनिंग करुन त्यांची नॉंद करुन घेणे बंधनकारक राहील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादर्भाव होवू नये याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी,  बँड पथकाकरिता व संगीत कार्यक्रमाकरिता आवश्यक असणारे साहीत्य नियमित निर्जंतुकीकरण करुन वापरणे बंधनकारक राहील, कोविड-19 चे अनुषंगाने केन्द्र शासन राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील, शासनाने वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या विविध आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

सदरचे आदेश हे दि. 10 नोव्हेंबर  पासून  संपूर्ण अकोला  शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ