93 अहवाल प्राप्त; 23 पॉझिटीव्ह

 


अकोला,दि. 14 (जिमाका)-आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 93 अहवाल प्राप्त झाले. त्यातील  70 अहवाल निगेटीव्ह तर 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि.13) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 40 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या  8716(6979+1560+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 44730 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे  43455 फेरतपासणीचे 239 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1036 नमुने होते. आजपर्यंत एकूण 44632 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 37653 तर पॉझिटीव्ह अहवाल 8716(6979+1560+177) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 23 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 23 जणांचे अहवाल  पॉझिटीव्ह आले. आज सकाळी 23 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सात महिला व 16 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जठारपेठ, अदलापुर ता. अकोट, केशव नगर,  डाबकी रोड, केलकर हॉस्पीटल व हिरपुर ता. मुर्तिजापूर  येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरीत गोकुल कॉलनी, गोरक्षण रोड, शास्त्री नगर, धानोरी, वृंदावन नगर, नंदखेड, मुर्तिजापूर, तारफैल क्वॉटर, बाळापूर, विश्वकर्मा नगर व शंकर नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. तसेच काल रात्री रॅपीड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 40 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

308 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 8716(6979+1560+177) आहे. त्यातील 283 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 8125 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 308 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम