प्रत्येक तालुक्यात शिवभोजन थाळी केंद्र
अकोला , दि . ३१ ( जिमाका )- देशातील लॉक डाऊन स्थिती पाहता शासनाने शिवभोजन थाळी केंद्रांची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून आता प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शिवभोजन थाळी केंद्र उद्यापासून सुरु होतील. दरम्यान आज मुर्तिजापूर व तेल्हारा येथील केंद्र कार्यान्वित ही झाले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली आहे. शिवभोजन थाळी योजनेचे कार्यान्वयन प्रजासत्ताक दिनापासून झाले होते. त्यात अकोला जिल्ह्यात केवळ अकोला शहरात दोन केंद्र सुरु झाले होते. आता लॉक डाऊन कालावधीत गोरगरीब लोकांना पुरेसे जेवण स्वस्तात मिळावे म्हणून प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शिवभोजन थाळी केंद्र सुरु करण्यात येत आहेत. स्वस्तधान्य वाटपात दिव्यांगांना प्राधान्य द्या आगमी तीन महिन्यासाठी स्वस्त धान्य वितरण पुरवठा विभागामार्फत होणार आहे. हे वाटप करतांना दिव्यांगांना वाटप प्राधान्याने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुरवठा विभागाच्या यंत्रणेला दिले आहेत. २० आश्रयकेंद्रात १६४२ जणांची व्यवस्था जिल्ह्यात परप्रांतातून आलेले व येथे लॉक डाऊन मुळे थांबावे लागलेल्या १...