गॅस पाईपलाईनच्या कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा
गॅस पाईपलाईनच्या कामाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात
चर्चा
अकोला, दि. 16
: घरगुती इंधनटंचाईच्या अडचणींवर मात करण्यासाठी गॅस पाईपलाईन हा सुरक्षित व
महत्वाचा स्त्रोत ठरणार आहे. जिल्ह्यात बार्शीटाकळी येथे पाईपलाईनद्वारे गॅस
पुरवठ्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.
या
अनुषंगाने बैठक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या दालनात आज झाली. तहसीलदार रवींद्र
कापशीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र यन्नावार, अदानी टोटल गॅस लि. चे सुरेंद्र
खाडे, राष्ट्रपाल वाहुरवाघ आदी यावेळी उपस्थित होते.
अकोला शहर व
जिल्ह्यात इतर ठिकाणी गॅस पाईपलाईन आणण्याच्या दृष्टीने हालचाली होत आहेत. घरगुती,
व्यावसायिक, औद्योगिक इंधनपुरवठा या माध्यमातून होणार आहे. बार्शीटाकळी येथे सर्वप्रथम
पाईपलाईन येणार असून, जागा निश्चिती व इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी,
असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. बार्शीटाकळी येथे नोंदणीची कामे लवकरच सुरू
होणार असल्याची माहिती श्री. खाडे यांनी दिली.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा