संविधानभवनमध्ये आज ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ जिल्हास्तरीय मेळावा

  

संविधानभवनमध्ये आज ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ जिल्हास्तरीय मेळावा

अकोला, दि. ११ : ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत अकोला जिल्हास्तरीय मेळावा उद्या (१२ जून) सकाळी ११ वा. संविधानभवन येथे होणार आहे.

राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह अनेक मान्यवर मेळाव्याला उपस्थित राहतील. मेळाव्यात अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, विविध विभागांची भूमिका, जिल्हास्तरीय अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात येईल.

गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, माता व बाल आरोग्य पोषण, स्वच्छता, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रतिबंध व नियंत्रण, तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार यावर अभियानाद्वारे भर दिला जात आहे. या अभियानात विविध शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्थांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असून, अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी केले आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन