डॉ. आनंदीबाई जोशी मुलींचे आयटीआय येथे प्रवेश सुरू


 डॉ. आनंदीबाई जोशी मुलींचे आयटीआय येथे प्रवेश सुरू 

अकोला, दि. ४ : महिलांना कौशल्याधारित व रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणा-या अकोल्यातील डॉ. आनंदीबाई जोशी मुलींचे आयटीआय येथे प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.  

केवळ महिलांसाठी असलेल्या या संस्थेत महिला सक्षमीकरणासाठी अनेकविध प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत.  अभ्यासक्रमाबरोबरच निवासासाठी स्वतंत्र वसतिगृह, ग्रंथालय, दरमहा ५०० रुपये विद्यार्थीवेतन व इतर सोयी-सुविधा दिल्या जात आहेत. येथेवयोमर्यादेचे कोणतेही बंधन नसल्यामुळे सर्व वयोगटातील महिलांना कौशल्याधारित शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.

कॉम्प्युटर ऑपरेटर, कॉस्मेटॉलॉजी, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन, बेकर अँड कन्फेक्शनर, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग, सेक्रेटरिअल प्रॅक्टिस आणि इंजिनिअरिंग अंतर्गत आयसीटीएसएम, आयडीडी  व इलेक्ट्रिकल मेकॅनिक या ट्रेड्सचे प्रशिक्षण दिले जाते. या अभ्यासक्रमांमुळे महिलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अनेक उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी मनकर्णा प्लॉट, श्री शिवाजी महाविद्यालय मार्ग,  अकोला येथील संस्थेशी थेट संपर्क साधून आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी या विनामूल्य प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. शरदचंद्र ठोकरे यांनी केले आहे.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन