जागतिक बालकामगारविरोधीदिनी जनजागृती
जागतिक बालकामगारविरोधीदिनी जनजागृती
अकोला, दि. 15 : जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात
सहाय्यक कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव बालकामगार रा. रा. काळे यांच्या मार्गदर्शनात
कामगार कार्यालयाकडून विविध कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यालयाकडून बालकामगार प्रथा विरोधी जनजागृती अभियान व सप्ताह राबविण्यात
आला. या अभियानांतर्गत विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन दुकाने,
हॉटेल्स, व्यापारी संस्था आणि इतर आस्थापनांतील व्यापाऱ्यांना बालमजुरीविरोधी कायदे
व त्याचे दुष्परिणाम याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बालमजुरी निर्मूलनाचे महत्त्व
पटवून देत जनजागृती करण्यात आली.
व्यापाऱ्यांकडून "आमच्या आस्थापनात बालकामगार कार्यरत नाहीत आणि
यापुढेही ठेवणार नाही" असे हमीपत्र भरून घेण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
18 वर्षांखालील बालक किंवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवणाऱ्या आस्थापनांवर कायदेशीर
कारवाई करण्यात येणार आहे. लहान वयात काम केल्याने बालकांच्या त्वचा, श्वसनसंस्था,
मेंदू व पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होतो. यामुळे त्यांच्या मानसिक, शारीरिक व बौद्धिक
विकासावर परिणाम होऊन त्यांची वाढ खुंटते. प्रत्येक बालकाला शिक्षण व चांगले जीवन जगण्याचा
अधिकार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बालमजुरीमुक्त महाराष्ट्र अभियानात जागरूक
नागरिक म्हणून सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त रा.
रा. काळे यांनी यानिमित्त केले.
0000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा