आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जूनला साजरा होणार डॉ. पं. दे. कृ. वि. दीक्षांत सभागृहात कार्यक्रम
आंतरराष्ट्रीय योग
दिन २१ जूनला साजरा होणार
डॉ. पं. दे. कृ. वि.
दीक्षांत सभागृहात कार्यक्रम
अकोला, दि. १९ : जिल्हा
प्रशासनातर्फे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त २१ जून रोजी
सकाळी ६.३० ते ८ वा. दरम्यान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील दीक्षांत समारंभ
सभागृहात योग मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा प्रशासन, जिल्हा
क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,
मेरा युवा भारत केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, शिक्षण विभाग, पोलीस प्रशिक्षण केंद्र,
एन.सी.सी., स्काऊट गाईड, होमगार्ड, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग, योग भारती,
क्रीडा भारती, अकोला योग परिषद, विविध सामाजिक संस्था तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील
अधिकारी-कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील नागरिक, खेळाडू,
स्वयंसेवी संस्था व क्रीडा मंडळांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी
करावा असे आवाहन जिल्हा प्रशासन, तसेच क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा