अकोल्यात बुधवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
अकोल्यात
बुधवारी पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा
अकोला, दि. ८ : नोकरी इच्छुक
उमेदवारांना खासगी क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात याकरिता जिल्हा
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राद्वारे १० जूनला सकाळी १० वा.
पं. दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात २ नामांकित कंपन्यांतील एकूण ३८
पदांची भरती करण्यात येत आहे. यामध्ये दहावी,बारावी, आयटीआय, पदवीधर उमेदवारांना
संधी उपलब्ध आहेत.
सदर मेळाव्यासाठी ऑनलाईन आवेदन करणे
करिता https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index या वेबपोर्टलच्या माध्यमातून
ऑनलाईन माध्यमातून नोंदवावी व दिनांक १०/०६/२०२६ रोजी मुलाखतीसाठी प्लेसमेंट
ड्राईव्ह (रोजगार मेळाव्यास) प्रत्यक्ष उपस्थित राहावे.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार
मेळाव्यास" ऑनलाईन सहभाग नोंदविण्यासाठी पुढील प्रक्रिया करावी. www.mahaswayam.gov.in
या संकेतस्थळाला भेट द्या. एम्प्लॉयमेंट टॅबवर क्लिक करा. जॉबसीकर हा पर्याय
निवडून आपला सेवायोजन नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक व पासवर्ड वापरून साईन इन
करा. आपल्या होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडा. अकोला जिल्हा निवडून फिल्टर
बटणावर क्लिक करा नंतर दिनांकित मेळावा दिसेल त्यासमोर असलेल्या ॲक्शन बटणाच्या
खाली व्ह्यू आणि अप्लाय बटन दिसेल.
त्यानंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती
दिसेल. आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटणावर क्लिक करा. आय ॲग्री हा
पर्याय निवडा.
दिनांक १० जून २०२६ रोजी जास्तीत जास्त
नोकरी इच्छुक उमेदवारांनी आपला बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच पासपोर्ट साईज
फोटो व इतर आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,
अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा. मेळाव्यासंबंधित अधिक
माहिती करिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०७२४-२४३३८४२ किंवा ७०२४२४१०९८ /
९४२१४२५०६६ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त,
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अकोला यांनी केले
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा