प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण नियोजनभवनात शुक्रवारी जिल्हास्तरीय कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थितीतील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

 

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण

नियोजनभवनात शुक्रवारी जिल्हास्तरीय कार्यक्रम

पंतप्रधानांच्या उपस्थितीतील मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

अकोला, दि. १८ : कर्मचारी भविष्य निधी संघटन विभागीय कार्यालयातर्फे प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ वितरण कार्यक्रम उद्या दि. १९ जून रोजी  दु. ४ वा. नियोजनभवनात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे आयोजित राष्ट्रस्तरीय मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही यावेळी केले जाईल.

राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहतील. रोजगार वृद्धी, पात्र व्यक्तींपर्यंत लाभ पोहोचविणे हा या योजनेचा उद्देश आहे, अशी माहिती विभागीय भविष्य निधी आयुक्त अजयकुमार यादव यांनी दिली.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन