सामाजिक न्यायदिनी शहरात समता दिंडी

 

सामाजिक न्यायदिनी शहरात समता दिंडी

अकोला, दि. 23 : राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचा जन्म दिवस अर्थात सामाजिक न्याय दिनी दि. २६ जून  रोजी सामाजिक न्याय विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सामाजिक न्याय भवनापासून सकाळी ८.३० वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहांचे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी सहभागी होतील.  राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेत सकाळी ११ वा. सामाजिक न्याय भवनात मुख्य कार्यक्रम होणार आहे. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन