पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
अकोला, दि. 22 : दि. 2 जून, 2026 रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहिर केली आहे. सदर योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), राष्ट्रीयकृत / ग्रामीण / खाजगी बँकांकडून दि. 01 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान उचल केलेल्या व दि. 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेल्या आणि दि. 31 मार्च, 2026 अखेर परतफेड न झालेल्या एक किंवा अनेक बँकांकडील सर्व थकीत पिककर्ज/ पुनर्गठन / फेरपुनर्गठन थकबाकीचे मुद्दल व व्याजासह अधिकतम रक्कम रु.2 लाखापर्यंत लाभ देण्यात येणार आहे. तसेच थकबाकीची रक्कम रु.2 लाखापेक्षा जास्त असल्यास अशा शेतकऱ्याने प्रथम 2 लाखापेक्षा जास्त असलेली थकीत रक्कम परतफेड करणे आवश्यक असून अशी रक्कम परतफेड केल्यानंतर पात्र शेतकऱ्याला एकवेळ समझोता योजनेंतर्गत रु.2 लाख रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेचा लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना सर्व कर्ज खात्यातील एकत्रित थकबाकीची मुद्दल व व्याजासह एकूण रक्कम रु.50 हजाराचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच सन 2022- 23, 2023-24, 2024-25 या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पिक कर्जाची उचल करून आर्थिक वर्ष संपल्यानंतर 30 जून पूर्वी किंवा बँकेच्या प्रचलित नियमानुसार विहित कालावधीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना रु.50 हजार इतक्या अधिकतम रकमेचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच पीक कर्जाची रक्कम रु.50 हजार पेक्षा जास्त असल्यास प्रत्यक्ष परतफेड केलेली रक्कम किंवा किमान रु.5 हजार एवढा प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार क्रमांक व अॅग्रीस्टेंक आय.डी. अनिवार्य केलेला असून सदर माहिती संबंधित बँकेकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे.तरी सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे आधार क्रमांक व अंग्रीस्टेंक आय. डी. बाबतची माहिती त्यांच्या बँक शाखेस तात्काळ सादर करणेबाबत जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे. तसेच ज्या पात्र शेतकऱ्यांची अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, अशा शेतकऱ्यांनी त्वरीत अॅग्रीस्टेक नोंदणी करून त्यांची माहिती बँकेस / सेवा सहकारी संस्थेस त्वरीत सादर करणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा