मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम बीएलओंना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन





 

 

 

 

मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम

      बीएलओंना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे

      जिल्हाधिकारी वर्षा मीना यांचे आवाहन

            अकोला, दि. २३ : भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात सुरु झाली आहे. कार्यक्रमात ३० जून ते २९ जुलैदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत घरोघरी भेटी देण्यात येणार आहेत. तरी नागरिकांनी बीएलओंना परिपूर्ण माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.

        विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिका-यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्र-परिषदेद्वारे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.  उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

                        मतदार याद्यांच्‍या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचे महाराष्‍ट्र राज्यासाठीचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

 

अ.क्र.

                 तपशील  

कालावधी/दिनांक

विशेष सखोल पुनरिक्षणासाठी अर्हता दिनांक

०१.१०.२०२६

तयारी, प्रशिक्षण व छपाई

२०.०६.२०२६ ते २९.०६.२०२६

मतदान केंद्रस्‍तरीय अधिका-यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी

३०.०६.२०२६ ते २९.०७.२०२६

मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण

२९.०७.२०२६ पर्यत

प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्‍दी

०५.०८.२०२६

दावे व हरकती दाखल करण्‍याचा कालावधी

०५.०८.२०२६ ते ०४.०९.२०२६

नोटीस टप्‍पा/दावे व हरकती निकालात काढणे

०५.०८.२०२६ ते ०३.१०.२०२६

अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्‍दी

०७.१०.२०२६

 

        मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाकडून दि.१८.०६.२०२६ रोजी मतदार यादी गोठविण्‍यात आली आहे. त्‍यानूसार अकोला जिल्‍ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्‍या व सन २००२/२००४ च्‍या मतदारांशी दिनांक २३.०६.२०२६ रोजी पर्यतची मॅपींगची टक्‍केवारी खालीलप्रमाणे आहे.

 

विधानसभा मतदार संघाचे नाव

पुरुष

स्‍त्री

इतर

एकूण

सन २००२/२००४ च्‍या मतदारांशी मॅपींगची टक्‍केवारी

२८-अकोट विधानसभा मतदार संघ

१५८३१०

१४८५९८

३०६९१२

८७.९६

२९-बाळापूर विधानसभा मतदार संघ

१५७४५७

१५०३९५

३०७८५४

८५.४१

३०-अकोला(पश्चिम)विधानसभा मतदार संघ

१६५३७३

१६८१६७

२१

३३३५६१

६४.७४

३१-अकोला(पूर्व)विधानसभा मतदार संघ

१७८०४८

१७२१३२

१३

३५०१९३

७१.७९

३२-मुर्तिजापूर(अजा)विधानसभा मतदार संघ

१५२१७२

१४४९४७

२९७१२४

९४.९८

ए‍कूण

८११३६०

७८४२३९

४५

१५९५६४४

८०.३७

               

 

               


                विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाला महाराष्ट्रामध्ये कामास सुरुवात झाली आहे. विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याबाबतची कार्यवाही जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे नियंत्रणाखाली अकोला जिल्‍हयातील सर्व मतदार नोंदणी अधिकारी (ERO) व सहायक मतदार नोंदणी अधिकारी (AERO), मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी, मतदान केंद्रस्‍तरीय पर्यवेक्षक यांच्याकडून करण्यात येत आहे. त्‍याकरीता नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी मनुष्‍यबळाचा तपशील खालील प्रमाणे

विधानसभा मतदार संघाचे नाव

एकूण मतदान केंद्रांची संख्‍या

मतदार नोंदणी अधिकारी यांची संख्‍या

सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांची संख्‍या

मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (BLO) यांची संख्‍या

मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांना सहाय्य करणा-या कर्मचारी यांची संख्‍या

मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांची संख्‍या

राजकीय पक्षांद्वारे नियुक्‍त मतदान केंद्रस्‍तरिय प्रतिनिधी यांची संख्‍या

२८-अकोट

३४६

०१

२८

३४६

११८६

३५

३४६

२९-बाळापूर

३४७

०१

१३

३४७

६९४

३५

७१६

३०-अकोला(पश्चिम)

३०७

०१

०९

३०७

६१४

३१

९२१

३१-अकोला(पूर्व)

३५१

०१

०७

३५१

१४३४

३५

४६७

३२-मुर्तिजापूर(अजा)

३९०

०१

०८

३९०

७८०

३९

८२६

ए‍कूण

१७४१

०५

६५

१७४१

४७०८

१७५

३२७६

                

                मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाअंतर्गत मतदार यादी निरीक्षक (Electoral Roll Observers) म्‍हणून मा.विभागीय आयुक्‍त, अमरावती विभाग यांची नेमणूक मा.भारत निवडणूक आगोया मार्फत करण्‍यात आली आहे.

 

 प्रशिक्षण कार्यक्रम-

                मा.भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणी अधिकारी,सहायक मतदार नोंदणी अधिकारी  यांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. तसेच मतदार नोंदणी अधिकारी यांनी त्‍यांचे अधिनस्‍त मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी, मतदान केंद्रस्‍तरीय पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांना सहायक तसेच विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाकरीता नियुक्‍त अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण पुर्ण करण्‍यात आले आहे. त्‍याप्रमाणे राजकीय पक्षांव्‍दारे नियुक्‍त केलेल्‍या मतदान केंद्रस्‍तरीय प्रतिनिधी (BLA) यांना प्रशिक्षण देण्‍याची कार्यवाही मतदार नोंदणी अधिकारी यांच्‍यामार्फत करण्‍यात येत आहे.

 

गृहभेट कार्यक्रम-

      मतदान केंद्रस्‍तरीय अधिका-यांमार्फत (BLO) घरोघरी भेटी/House to House Visits By BLOs

            विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दि.३०.०६.२०२६ ते दि.२९.०७.२०२६ या कालावधीमध्‍ये प्रत्येक मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी, म्‍हणजेच BLO हे त्यांच्‍याशी संबंधित यादी भागातील प्रत्येक मतदाराची अंशतः माहिती आधीच भरलेला दोन प्रतींमधील गणना फॉर्म (Enumeration Form) संबंधित मतदारांना देण्‍यासाठी व मतदारांनी सदर Enumeration Form मधील माहिती भरल्यानंतर सदर फॉर्मची एक प्रत परत घेण्‍यासाठी त्यांच्‍या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घरी दिनांक ३० जून २०२६ ते दिनांक २९ जुलै २०२६ या कालावधीमध्‍ये भेटी देणार आहेत. मतदारांनी BLO यांना आवश्‍यक सहकार्य करावे व त्यांना मिळालेल्या Enumeration Form मधील सर्व तपशील भरून सदर फॉर्मवर विहित केलेल्या ठिकाणी आपला अलीकडच्‍या कालावधीमध्‍ये काढलेला रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवून Enumeration Form दिनांक २९.०७.२०२६ पुर्वी BLO यांच्‍याकडे जमा करावा.

            मतदारांना सदर गणना पत्रकामधील त्यांची स्‍वतःची किंवा त्यांच्‍या नातेवाईकांची (आई-वडील/आजी-आजोबा) यांची 2002-2004 च्या कालावधीतील (मागील विशेष सखोल पुनरिक्षण) मतदार यादीतील माहीती मा.भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/searchInSIR/S2UA4DPDf-JK4QWODSE या संकेतस्थळावरून त्‍याप्रमाणे ECINET हे App download  करुन त्‍यातून सहज उपलब्ध करुन घेता येईल, त्या साठी केवळ त्यावेळचे आपले राज्य, जिल्हा, विधानसभा मतदार संघ व संपूर्ण नाव एवढी प्राथमिक माहिती भरल्यास आपल्या जुन्या नोंदी सहज उपलब्ध होतील. या माहितीनुसार मतदारांनी त्‍यांच्‍या गणना पत्रकामध्‍ये माहिती भरावी. मतदार याद्या दोषविरहीत व अचूक असण्याच्या दृष्टीने व सर्व पात्र मतदारांचे मतदार यादीत नाव समाविष्ट असण्यासाठी या कार्यक्रमात सर्व मतदारानी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

            मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांच्‍या गृह भेटीदरम्यान एखादे घर बंद आढळल्यास गणना प्रपत्र ला बंद दरवाज्‍याच्‍या फटीमधून आत सरकवले जातील व ते भरलेले गणना पत्रक हस्‍तत करण्‍यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किमान 3 वेळा संबंधित घरांना भेट देतील. मतदारांस आपले गणना प्रपत्र https://voters.eci.gov.in  या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन पध्दतीने ही भरता येईल.  मतदारांकडून भरून प्राप्त झालेले गणना प्रपत्र विचारात घेऊन तयार केलेल्‍या प्रारुप मतदार याद्या दि.०५.०८.२०२६ रोजी प्रसिध्द करण्यात येतील. 

        ज्‍या मतदारांचे भरलेले गणना पत्रक विहित मुदतीत प्राप्‍त होणार नाहीत त्‍यांची नावे प्रारुप मतदार यादीमध्‍ये समाविष्‍ट होणार नाहीत. मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी स्‍थानिक चौकशी अंती अशा मतदारांचे Absent, Shifted, Death, Duplicate  (ASDD)  असे वर्गीकरण करुन त्‍यांची यादी तयार करुन भारत निवडणूक आयोग, जिल्‍हयाचे वेबसाईट वर तसेच मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तसेच स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांचे कार्यालयाच्‍या सुचना फलकावर प्रसिध्‍द करण्‍यात येईल.  

                प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द झाल्यानंतर ज्या मतदारांची नावे पूर्वीच्या मतदार यादीतील नोंदीशी जुळवणी झाली नसतील किंवा त्यांच्या जुळवणीमध्ये काही त्रुटी असतील अशा व्यक्तिना मतदार नोंदणी अधिकारी मार्फत नोटीसा पाठविण्यात येतील व त्यांनी सादर केलेल्‍या पुराव्यांच्‍या अनुषंगाने सुनावणीअंती मतदार नोंदणी अधिकारी उचित निर्णय घेतील.

                मतदार यादीमध्ये नोंदी जुळवणी न झाल्यामुळे मतदारांना सादर करावयाच्या कागदपत्रांची यादी गणना प्रपत्राच्या मागे दर्शविलेली आहे. आधार या कागदपत्रा संदर्भात मा.भारत निवडणूक आयोगाने दि.०९.०९.२०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार आधार हे ओळख पुरावा म्हणून वापरले जाते तथापि, आधार अॅक्ट, २०२६ च्या कलम ९ प्रमाणे आधारकार्ड ओळखीचा पुरावा म्‍हणून स्‍वीकारले जाईल तथापि, नागरिकत्वाचा, रहिवासाचा अथवा जन्‍मतारखेचा पुरावा म्हणून मानले जाणार नाही.

                या सर्व प्रक्रियेत निवडणूक यंत्रणेसह राजकीय पक्षांचे सहकार्य सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे. यास्तव राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले प्रतिनिधी (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात येते यामुळे मतदार याद्याच्‍या सखोल पुनरिक्षण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे. अकोला जिल्यातील सर्व राजकीय पक्षांनी आतापर्यंत ३२७६ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नेमले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जिल्हयातील प्रत्येक मतदार केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करणे बाबत राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना आवाहन करण्यात येत आहे.


मदत कक्ष(Help Desk) -

                सर्व विशेष सखोल पुनरिक्षण कालावधीमध्‍ये नागरिकांना माहिती देण्‍यासाठी त्‍याप्रमाणे त्‍याच्‍या अडचणींचे निराकरण करण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरावर मदत कक्षाची (Help Desk) स्‍थापना करण्‍यात आली आहे. त्‍याकरीता टोल फ्री असलेला १९५० तसेच ९१८०६५९०९८४४ हा दुरध्‍वनी क्रमांक कार्यन्वित करण्‍यात आला आहे. हे क्रमांक दिनांक ३०.०६.२०२६ रोजी पासून मतदार यादीच्‍या अंतिम प्रसिध्‍दीपर्यत सकाळी ६.०० पासून ते रात्री १०.०० वाजेपर्यत कार्यरत राहतील.

                तसेच मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय येथे मदत कक्ष (Help Desk) ची स्‍थापना करण्‍यात आलेली असून त्‍यांचे क्रमांक खालील प्रमाणे आहेत.

विधानसभा मतदार संघाचे नाव

दुरध्‍वनी क्रमांक

२८-अकोट विधानसभा मतदार संघ

९४२०१४६६५९

२९-बाळापूर विधानसभा मतदार संघ

७७४१८४५९८८

९७६३८६६६९९

३०-अकोला(पश्चिम)विधानसभा मतदार संघ

८०१०३८४०१४

३१-अकोला(पूर्व)विधानसभा मतदार संघ

७७७४००७६०८

३२-मुर्तिजापूर(अजा)विधानसभा मतदार संघ

९५५२७१५४६२

८६९८२९५१७७

                मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय येथे मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी मदत कक्षाची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या मदत कक्षामार्फत मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी यांना येणा-या अडचणी/समस्‍या(तांत्रिक व प्रशासकीय) याबाबत मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे.

        मा.भारत निवडणूक आयोगातर्फे मतदारासाठी मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी BLO ना कॉल करण्यासाठी Book a call  With BLO ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ECINET हे App download   करुन सदर अॅप मधील Book a call With BLO या सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येते.

                करिता मतदार याद्यांच्‍या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्‍या अनुषंगाने सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्‍यात येत आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन