केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कापूसकांती) कापूस पीक प्रात्यक्षिकात लागवड अंतराचे काटेकोर पालन करावे अधिक्षक कृषी अधिका-यांचे आवाहन
केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कापूसकांती)
कापूस पीक प्रात्यक्षिकात लागवड अंतराचे काटेकोर पालन
करावे
अधिक्षक कृषी अधिका-यांचे आवाहन
अकोला,
दि. २४ : केंद्र पुरस्कृत कापूस उत्पादकता अभियान (कापूस कांती) सन २०२६-२७ अभियानांतर्गत
पिकाची उत्पादकता वाढ व सुधारित वाणांच्या प्रसारासाठी कापूस पीक
प्रात्यक्षिके १०० टक्के अनुदानावर शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात
कार्यरत सहकारी संस्था यांच्यामार्फत राबविण्यासाठी
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतकरी
गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था यांची प्रथम येणाऱ्यास प्रथम
प्राधान्य तत्वावर निवड झाली आहे.
या शेतकरी गट / शेतकरी उत्पादक
कंपनी / कृषि क्षेत्रात कार्यरत सहकारी
संस्था यांनी पेरणी करतांना लागवड अंतराचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरली इंगळे यांनी केले आहे.
पीक प्रात्यक्षिके
: क्लोजर स्पेसिंगमध्ये लागवड अंतर ९०․३० सेमी आणि कापूस बियाणे पाकीट संख्या (हे) १० पाकीट, तसेच सघन कापूस लागवडमध्ये
लागवड अंतर ९०․१५ सेमी आणि कापूस बियाणे पाकीट संख्या (हे) १५ पाकीट असावी.
त्याचप्रमाणे, एकात्मिक पिक व्यवस्थापनात अंतर ९०․६० सेमी आणि कापूस बियाणे पाकीट संख्या (हे) ५ पाकीट (आंतर पिक
पद्धतीने) असावी.
अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या
सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि
अधिकारी डॉ.मुरली इंगळे, यांनी केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा