भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश

 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतीगृहात मोफत प्रवेश

अकोला, दि. 23 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेमार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह हे सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येत आहे. शैक्षणीक सत्र 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला या वसतीगृहात मागासवर्गीय विदयार्थ्याना वर्ग 8 वी ते पदवी पर्यन्त अकोला या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या बाहेर गांवच्या विद्यार्थ्याना टक्केवारी नुसार व शासन निर्णयानुसार वसतीगृहात रिक्त असलेल्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु आहे. वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे अर्ज करावयाचा कालावधी शालेय विद्यार्थ्यांसाठी दिनांक 30 जून 2026  व 11 वी व 12 वी  नंतरच्या अभयासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 15 जुलै 2026 पर्यंत आहे तसेच 12 वी नंतरच्या, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 15 जुलै 2026 पर्यंत राहील. http://hmas.mahait.org वेबसाईट वर भरण्यात यावे. वसतीगृहामध्ये खालील प्रमाणे विदयार्थ्याना मोफत सोयीसुवीधा पुरविण्यात येतात 1) राहण्याची व्यवस्था, 2) नास्ता व भोजनाची तसेच 3) स्टेशनरी भत्ता 4) गणवेश भत्ता 5) मासीक निर्वाह भत्ता 6) विदयार्थ्या करीता सोयीयुक्त अभ्यासीका इत्यादी सोयी सुवीधा मोफत पुरविण्यात येतात. करीता विदयार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरुन वसतीगहात सादर करावे असे आवाहन मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अकोला व गृहपाल यांनी केलेले आहे. गृहपाल के.एम. तिडके यांचेशी सम्पर्क साधावा. मो.नं.8308058833

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन