अकोला जिल्हाधिकाऱ्यांचे खत खरेदीबाबत आदेश
अकोला, दि. १३ : जिल्ह्यात युरिया आणि डी.ए.पी. खतांच्या खरेदीसाठी प्रशासनाने नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश जारी केला.
खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी ७/१२ उतारा घेणे आता अनिवार्य नाही.
प्रतिएकरी मर्यादित खत वाटप: एका शेतकऱ्याला त्याच्या गरजेनुसार पेरणीपुरते किमान १ पोते आणि जास्तीत जास्त ५ पोते (Bags) युरिया व डी.ए.पी. खताचे वाटप केले जाईल.
कोणत्याही व्यक्तीला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खताचा साठा दिला जाणार नाही.
सर्व घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांनी प्रत्येक विक्रीची नोंद योग्य कागदपत्रांसह आपल्या नोंदवहीत अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे.
खतांचा तुटवडा रोखण्यासाठी आणि गरजू शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून खतांचा काळाबाजार किंवा साठेबाजी केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा