भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (गुणवंत)मुलांचे शासकीय वसतीगृह

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (गुणवंत)मुलांचे शासकीय वसतीगृह

अकोला दि. 24 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (गुणवंत) मुलांचे शासकीय वसतिगृह अकोला हे वसतीगृह समाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येत आहे. शैक्षणीक सत्र 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे (गुणवंत) शासकीय वसतिगृह अकोला या वसतीगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वर्ग 11 वी ते 12 वी पर्यंत अकोला या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या बाहेर गावाच्या विद्यार्थ्यांना टक्केवारी नुसार व शासन निर्णयानुसार वसतीगृहात रिक्त असलेल्या जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु आहे. वसतीगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. अर्ज करावयाचा कालावधी वर्ग 10 वी नंतरच्या अभयासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. 15 जुलै 2026 पर्यंत आहे. http://hmas.mahait.org. वेबसाईट वर भरण्यात यावे. वसतीगृहामध्ये खालीलप्रमाणे विद्यार्थ्यांना मोफत सोयी सुवीधा पुरविण्यात येतात 1) राहण्याची व्यवस्था, 2) नास्ता व भोजनाची तसेच 3) स्टेशनरी भत्ता 4) गणवेश भत्ता (5) मासीक निर्वाह भत्ता 6) विद्यार्थ्या करीता सोयीयुक्त अभ्यासीका इत्यादी सोयी सुवीधा मोफत पुरविण्यात येतात. करीता विदयार्थ्यानी ऑनलाईन अर्ज भरुन वसतीगहात सादर करावे असे आवाहन मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अकोला व गृहपाल यांनी केलेले आहे. गृहपाल श्री. के. एम. तिडके मो.नं.8308058833 यांचेशी सम्पर्क साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन