मिफ्फ-2026 निमित्त फिल्मसिटीकडून मराठी लघुपट व माहितीपटांचे आयोजन

 


 

मिफ्फ-2026 निमित्त फिल्मसिटीकडून

मराठी लघुपट व माहितीपटांचे आयोजन

अकोल्याच्या साहिल इंगळेंच्या लघुपटाचाही समावेश

 

अकोला दि. 16 : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 (मिफ्फ) च्या पार्श्वभूमीवर दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या वतीने मराठी भाषेतील निवडक 19 लघुपट आणि माहितीपटांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघु नाट्यगृहात आ‍ज झाले आहे.

या महोत्सवात अकोल्याच्या साहिल इंगळे या युवकाने निर्माण केलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाचा भारतीय प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट १८ जून रोजी सकाळी ११:३० वाजता ऑडी १, एनएफडीसी येथे दाखवला जाईल.

साहिल इंगळे यांच्या या लघुपटाने कान्स चित्रपट महोत्सव २०२५ च्या प्रतिष्ठित 'ला सिनेफ' (La Cinef) विभागात अधिकृत निवड मिळवून आधीच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली आहे. या विभागात निवडला गेलेला तो एकमेव भारतीय चित्रपट होता.

 

मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित आणि प्रस्थापित दिग्दर्शकांच्या कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन