धामणा येथील श्री मारोती संस्थानसाठी विश्वस्त नेमणार

 

धामणा येथील श्री मारोती संस्थानसाठी विश्वस्त नेमणार

अकोला, दि. ५ : धर्मादाय सहआयुक्त, अमरावती यांच्या आदेशानुसार धामणा येथील श्री मारोती संस्थानसाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४७ प्रमाणे नवीन विश्वस्तांची नेमणूक करण्यात येणार आहे.

या न्यासात कोणाला विश्वस्त होण्याची इच्छा असेल तसेच यासंबंधीच्या चौकशी प्रकरणांमध्ये कोणाला काही हरकत घ्यावयाची असेल किंवा पुरावा द्यावयाचा असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून आपले म्हणणे ३० दिवसांच्या आत सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अमरावती यांना पाठवावे. चौकशी पूर्ण करून निकालाबाबत योग्य आदेश दिले जातील, अशी नोटीस सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधिक्षकांनी (न्याय) काढली आहे.

धर्मादाय सहआयुक्त कार्यालयाचा पत्ता म्हाडाभवन, दुसरा माळा, तात्या टोपेनगर, माल टेकडीजवळ, अमरावती असा आहे.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन