पाणीपुरवठ्यासाठी खाजगी टँकर निविदा प्रक्रिया सुरू

 


पाणीपुरवठ्यासाठी खाजगी टँकर निविदा प्रक्रिया सुरू

अकोला, दि. 16 : जिल्ह्यातील पाणीटंचाईग्रस्त ग्रामीण भागातील गावे, वाड्या, तांडे तसेच (क) वर्ग नगरपालिका क्षेत्रात आवश्यकतेनुसार खाजगी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी इच्छुक निविदाधारकांकडून ई-निविदा मागविण्यात आल्या आहेत.

या कामासाठी ई-निविदा फॉर्मची किंमत प्रति निविदा रु. 5 हजार असून ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने जिल्हाधिकारी, अकोला यांच्या नावे एसबीआय इंटरनेट बँकिंग किंवा एनईएफटीद्वारे भरावी लागणार आहे. रक्कम जमा केल्यानंतर ई-निविदा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध होईल.

ई-निविदा फॉर्मची विक्री व डाउनलोड प्रक्रिया 16 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजेपासून ते 30 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. निविदेसाठी रु. 2 लाख अनामत रक्कम ऑनलाईन जमा करावी लागणार असून रु. 10 लाख सुरक्षा ठेव रक्कम किंवा राष्ट्रीयकृत बँकेची बँक गॅरंटी (हमीपत्र) अथवा एफडीआर निविदेसोबत स्कॅन कॉपी अपलोड करणे आवश्यक आहे.

ई-निविदा भरण्याची अंतिम मुदत 30 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. निविदेतील लिफाफा क्र. 1 व 2 हे  दि. 1 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उघडण्यात येणार आहेत. लिफाफा क्र. 1 मधील मूळ कागदपत्रे 30 जून रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे बंधनकारक राहील.

निविदेबाबतची सविस्तर माहिती व अटी-शर्ती https://mahatenders.gov.in व http://www.akola.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन