कोषागारातर्फे ‘डीडीओं’ना नवीन सेवार्थ प्रणालीचे धडे
कोषागारातर्फे ‘डीडीओं’ना नवीन सेवार्थ प्रणालीचे धडे
अकोला, दि. २९ : लेखा व कोषागारे संचालक यांच्याकडून
नवीन सेवार्थ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्हा कोषागारातर्फे त्याचे विविध
कार्यालयांच्या आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचा-यांना कार्यशाळेद्वारे प्रशिक्षण गुरूवारी
देण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक श्याम धनमने व जिल्हा कोषागार अधिकारी
मा. ब. झुंजारे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचा शुभारंभ झाला. अपर कोषागार अधिकारी सविता
भगत, अपर कोषागार अधिकारी मीनाक्षी पवार तसेच अपर कोषागार अधिकारी मोना मोहोड व मोठ्या
संख्येने अकोला जिल्हा व तालुक्यातील कार्यालयप्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी उपस्थित
होते.
शासकीय कामकाज कागदविरहित, गतिमान व अधिक पारदर्शक करण्यासाठी वित्त
विभागातर्फे अधिकारी, कर्मचारी यांची सेवार्थ प्रणालीत ई-वेतन देयके तयार केली जातात.
या प्रणालीत सुधारणा करून आता नवीन सेवार्थ
प्रणाली विकसित करण्यात आली आहे.
नवीन प्रणालीचा वापर करताना कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये या
उद्देशाने अमरावतीचे लेखा व कोषागारे सहसंचालक यांनी विभागातील सर्व कोषागार अधिकारी
यांना सदर नवीन सेवार्थ प्रणालीचे प्रशिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार
ही कार्यशाळा झाली.
जिल्हा कोषागारामार्फत जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात
अकोला जिल्ह्यातील व तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयाचे कार्यालयप्रमुख, तसेच आहरण
व संवितरण अधिकारी यांना नवीन सेवार्थ प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले. कोषागार कार्यालयातील
उपलेखापाल सागर पांडे, तांत्रिक सहाय्यक सुदन अहिर यांनी उपस्थितांना प्रात्यक्षिकाद्वारे
प्रशिक्षण दिले. उपस्थित कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले.
अकोला जिल्हा व तालुक्यातील बहुसंख्य आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
नवीन सेवार्थ प्रणालीचे प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे. कनिष्ठ लेखापाल विशाल मानकर
यांनी सूत्रसंचालन केले.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा