रोड सेफ्टी व्हिजन वाहनाद्वारे पीएम राहत व राहवीर योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश


 रोड सेफ्टी व्हिजन वाहनाद्वारे पीएम राहत व

 राहवीर योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश


अकोला, दि ८ : राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक  यांनी अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा विषयक जनजागृतीबाबत राबविण्यात येणाऱ्या‘रोड सेफ्टी व्हिजन’वाहनाची पाहणी करीत रोड सेफ्टी व्हिजन वाहनाची सविस्तर माहिती घेतली.या वाहनाद्वारे रस्ता सुरक्षासह ऑटोचालकांना मराठी भाषेच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.



रोड सेफ्टी व्हिजन वाहनाच्या माध्यमातून ऑटोचालकांसाठी मराठी भाषेचे प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे राबविणे, तसेच ‘पीएम राहत’ व ‘राहवीर’ योजनांबाबत व्यापक जनजागृती करणे, आणि शासनाच्या विविध योजनांचा प्रसार करण्याबाबत  सूचना दिल्या.


महाराष्ट्र राज्यात केवळ अकोला जिल्ह्यात अशा प्रकारे रोड सेफ्टी व्हिजन व्हॅनद्वारे प्रभावी जनजागृती करण्यात येत असल्याबद्दल त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार व प्रादेशिक परिवहन विभागाचे कौतुक केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन