दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार
अकोला, दि. 3 : सन २०२६-२७ मध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांगजन सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार - २०२६ करीता ऑनलाईन अर्ज / नामांकन मागविण्यात आले आहेत. सदर प्रस्ताव दि.३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज / नामांकन स्विकारण्यासाठी खुले करण्यात आले असून सर्व अर्ज / नामांकन हे केवळ ऑनलाईन पध्दतीनेच www.awards.gov.in, Rashtriya Puraskar Portal किंवा Department of Empowerment of Person with Disabilities (DEPWD) या पोर्टलवर सादर करावयाचे आहेत. सदर पुरस्कारासाठी पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, नियोक्ते, कर्मचारी, व्यक्ती किंवा संबंधीत घटकांनी निर्धारित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावे. अर्जामध्ये उल्लेखनिय व प्रेरणादायी कार्याची सविस्तर माहिती नमुद करणे आवश्यक आहे, असे आवाहन दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तुषार जाधव यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा