तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भर अभियान  गोदाम बांधकाम, मिनी ऑईल मिलसह अनेक लाभशेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

तेलबिया  व कडधान्य आत्मनिर्भर अभियान  

गोदाम बांधकाम, मिनी ऑईल मिलसह अनेक लाभ

शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन

 

अकोला, दि. 17 : राष्ट्रीय खाद्यतेल- तेलबिया व कडधान्य आत्मनिर्भर अभियानात गोदाम बांधकाम, मिनी ऑईल मिल, काढणी पश्चात पायाभूत सुविधांसाठी अनुदान देय असून, जिल्ह्यातून अधिकाधिक शेतकरी बांधवांनी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले.

गोदाम बांधकाम

सुरक्षित साठवणूकीसाठी गोदाम बांधकामाची तरतूद असून सरकारी, खाजगी उद्योग, समूह आधारित व्यवसाय संस्था, शेतकरी उत्पादक संस्था / शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्थां आणि मूल्य साखळी भागीदार गटास प्राधान्य दिले जाईल

           गळीतधान्य उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी व मूल्य वृद्धीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे. अभियानांतर्गत प्रती २५० मेट्रिक टन गोदाम बांधकामचे दर (बांधकाम, अंतर्गत रस्ते , वीज व्यवस्था, रॉयल्टी, प्रयोगशाळा चाचणी शुल्क, वस्तू व सेवा कर) मापदंड प्रती मेट्रिक टन रु.११,५२१/- याप्रमाणे असून २५० मेट्रिक टन क्षमतेच्या गोदामाकारीता रु.२८,८०,२५० लाख खर्चाच्या ५० टक्के किंवा रु. १४,४०,०००/- यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान अनुज्ञेय राहील.सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छुक अर्जदार यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे अर्ज सादर करावा.

 

काढणी पश्चात पायाभूत सुविधा (तेल काढणी युनिट १० टन क्षमता)

तेलबिया गोळा करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि तेल काढण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी बनवण्यासाठी काढणी पश्चात पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आणि त्यांना अधिक अद्ययावत करण्यासाठी मदत देण्यात येईल.

पात्र संस्था / लाभार्थी -  वैयक्तिक लाभार्थी / शेतकरी,  सहकारी / खाजगी उद्योग, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) , सहकारी संस्था, तेलावर प्रक्रिया करणाऱ्या नोंदणीकृत नवीन कंपनी किंवा प्रकल्प, अभियान अंतर्गत निवड केलेले मूल्य साखळी भागीदार

 

               तेल काढणी युनिट (१० टन क्षमता)  आणि तेलबियांवर प्रक्रिया करण्यासाठी यंत्रसामग्री आणि उपकरणे आणि तेलबिया प्रक्रिया युनिट साठी अर्थसहाय्य दर प्रकल्प खर्चाच्या ३३ % कमाल रु. ९,९०,०००/- यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान १० टन प्रतिदिन क्षमतेच्या तेल काढण्याच्या युनिट्सच्या खरेदी आणि स्थापनेसाठी तसेच तेलबियांच्या प्रक्रियेसाठी संबंधित उपकरणांसाठी (जसे की, डीहलर, सिड क्लीनर, तेल काढण्याचे यंत्र, तेल गाळणी यंत्र) सहाय्य देण्यात येईल. कमी क्षमतेच्या युनिट्ससाठी, अनुदान हे समानुपाती प्रमाणात देण्यात येईल. तरी इच्छुक अर्जदार यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे अर्ज सादर करावा.

 

            काढणी पश्चात पायाभूत सुविधा (प्रक्रिया,पकेजिंग युनिट्स)

 

कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट (Processing Unit) स्थापना करण्यास आर्थिक सहाय्य प्रदान करणे, असा उद्देश आहे.

पात्र संस्था / लाभार्थी -  शेतकरी उत्पादक संस्था, क्लस्टर स्तर महासंघ, प्राथमिक कृषि पतसंस्था, उद्योजक, वैयक्तिक अर्जदार तसेच कोणत्याही अधिनियमांतर्गत नोंदणीकृत इतर उपक्रम.

 

      काढणी पश्चात पायाभूत सुविधा (प्रक्रिया,पकेजिंग युनिट्स) साठी प्रकल्प खर्चाच्या ३३ % किंवा कमाल रु. २५.०० लाख प्रती युनिट (यापैकी जे कमी असेल ते). अनुदान केवळ यंत्रसामग्री (प्रकल्प व यंत्रणा) खरेदी तसेच इमारत /गोदाम/साठवण पायाभूत सुविधा बांधकामासाठी दिले जाईल. जमीन, वीज, मनुष्यबळ ई. खर्चासाठी अनुदान देय राहणार नाही. तसेच, इमारत/गोदाम/साठवण पायाभूत सुविधांच्या बांधकामांसाठी अनुदानाचा जास्तीत जास्त हिस्सा एकूण पात्र अनुदानाच्या ३० % पर्यंत असेल (म्हणजे प्रकल्प खर्चाच्या ३३ % किंवा रु. २५ लाख यापैकी जे कमी असेल ते).

         सदर सहाय्य हे अनुदान स्वरुपात असून उर्वरित रक्कम अर्जदाराने मार्जिन मनी / बँक कर्जाद्वारे उभारणे आवश्यक राहील. सदर बाबीचा लाभ घेनेकरीता  अधिकृत संकेतस्थळ / ऑनलाईन पोर्टल अथवा विहित नमुन्यात ऑफलाईन पद्धतीने तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे अर्ज सादर करावा.

 

 

छोटी तेलघाणी (मिनी ऑईल मिल), एक्सपेलर फिल्टर प्रेस सह 

 

पात्रता – वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, मूल्य साखळी भागीदार गटास प्राधान्य दिले जाईल.

मिनी ऑईल मिल / एक्सपेलर फिल्टर प्रेस सह  या बाबीसाठी अनु.जाती/ अनु.जमाती/अल्प/सीमांत/महिला प्रवर्ग साठी युनिटच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा सदर युनिटसाठी निर्धारित उच्चतम मर्यादेत रु. ४.०० लाख प्रती युनिट तसेच सर्वसाधारण प्रवागासाठी युनिटच्या किंमतीच्या ४० टक्के किंवा  सदर युनिटसाठी निर्धारित उच्चतम मर्यादेत रु. ४.०० लाख प्रती युनिट अनुदान असून कृषि यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सुचानाप्रमाणे / महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच सदर घटकासाठी प्राधान्याने FPO / FPC यांना प्राधान्य देण्यात येवून लक्षांक शिल्लक राहिल्यास वैयक्तिक लाभार्थांना लाभ देण्यात येईल.

 

छोटी तेलघाणी (मिनी ऑईल मिल)  (एक्सपेलर फिल्टर प्रेसशिवाय)

 

पात्रता – वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, मूल्य साखळी भागीदार गटास प्राधान्य दिले जाईल.

 

मिनी ऑईल मिल / एक्सपेलर फिल्टर प्रेस सह  या बाबीसाठी अनु.जाती/ अनु.जमाती/अल्प/सीमांत/महिला प्रवर्ग साठी युनिटच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा सदर युनिटसाठी निर्धारित उच्चतम मर्यादेत रु.३.०० लाख प्रती युनिट तसेच सर्वसाधारण प्रवागासाठी युनिटच्या किंमतीच्या ४० टक्के किंवा  सदर युनिटसाठी निर्धारित उच्चतम मर्यादेत ३ लाख रू. प्रती युनिट अनुदान असून कृषि यांत्रिकीकरण उपअभियानाच्या मार्गदर्शक सुचानाप्रमाणे / महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच सदर घटकासाठी प्राधान्याने शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्राधान्य देण्यात येवून लक्षांक शिल्लक राहिल्यास वैयक्तिक लाभार्थांना लाभ देण्यात येईल.         

                 वरील सर्व घटकांचा लाभ घेण्याकरीता दि. १५ जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ.मुरली इंगळे यांनी केले आहे.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन