अकोला तालुक्यातील घरगणना पूर्ण


 अकोला तालुक्यातील घरगणना पूर्ण

जिल्हाधिका-यांच्या हस्ते तहसीलदारांचा गौरव

अकोला, दि. ९ : अकोला जिल्ह्यातून अकोला तालुक्याने सर्वात प्रथम घरगणनेचे काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या हस्ते तहसीलदार कुणाल झाल्टे यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

प्रधान जनगणना अधिकारी जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांच्या अधिनस्त जनगणना २०२७ चे पहिल्या टप्प्यातील एकुण ३७६ गटांचे घरगणनेचे कार्य जिल्ह्यात सर्वात प्रथम अकोला तालुक्यात पूर्ण झाले. विहित वेळेआधी काम पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी तहसीलदार कुणाल झाल्टे व त्यांच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन करून त्यांना जनगणनेच्या पुढील कार्याकरीता शुभेच्छा दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी गजेंद्र मालठाणे व जनगणना विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन