विशेष सखोल पुनरिक्षण काळात वीज पुरवठा अखंडित ठेवा जिल्हाधिकाऱ्यांचे महावितरणला आदेश
विशेष सखोल पुनरिक्षण
काळात वीज पुरवठा अखंडित ठेवा
जिल्हाधिकाऱ्यांचे
महावितरणला आदेश
अकोला, दि. १९ : भारत
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण
कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेदरम्यान अकोला जिल्ह्यातील
निवडणूक विषयक कामकाज विनाअडथळा पार पाडण्यासाठी सर्व संबंधित शासकीय कार्यालयांचा
विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
वर्षा मीना यांनी महावितरणला दिले आहेत
२० ते २९ जून दरम्यान
फॉम्स डाउनलोडिंग प्रक्रिया
निवडणूक आयोगाकडून ऑनलाईन प्राप्त झालेले सर्व मतदारांचे अधिकृत नोंदणी अर्ज दि. २०
जून ते २९ जून या कालावधीत डाउनलोड केले जाणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ती ठराविक वेळेतच
पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या कालावधीसह संपूर्ण पुनरिक्षण मोहिमेदरम्यान वीज
पुरवठा खंडित होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
वीज पुरवठ्यावर देखरेख
ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी एका 'नोडल अधिकाऱ्याची' नियुक्ती करण्याचे बंधनकारक करण्यात
आले आहे (
असे असेल मोहिमेचे
वेळापत्रक
या विशेष मोहिमेसाठी १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता तारीख निश्चित करण्यात आली आहे . पूर्वतयारी,
प्रशिक्षण आणि छपाईचे काम २० ते २९ जून दरम्यान चालेल .त्यानंतर ३० जून ते २९ जुलै
या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करतील २९ जुलैपर्यंत
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण पूर्ण करून ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
केली जाईल. या यादीवर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या काळात नागरिकांना दावे व हरकती दाखल
करता येतील या सर्व हरकती ३ ऑक्टोबरपर्यंत निकाली काढून, अखेर
७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे .
राष्ट्रीय महत्त्वाचे
आणि अत्यंत संवेदनशील काम असल्याने महावितरणने या कामाला प्रथम प्राधान्य द्यावे, असे
जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा