गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश
गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश
अकोला, दि. 22 : महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत शासन निर्णय दि. १४ मे 2025 आणि ४ डिसेंबर २०२५ तरतुदीनुसार गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये प्रवेश देणे या योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळा चालविणाऱ्या व इच्छुक असलेल्या नामांकित शैक्षणिक संस्था / शाळांचे प्रस्ताव अद्याप शासनास प्राप्त झालेले नसल्यामुळे "गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत निवासी शाळेत इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी इंग्रजी माध्यम निवासी शाळा चालविणाऱ्या व इच्छुक असलेल्या नामांकित शैक्षणिक संस्था / शाळांकडून प्राप्त विहित नमुन्यातील परिपूर्ण प्रस्ताव "या कार्यालयास संबंधित शाळांनी सादर करावे, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यांच्यामार्फत करण्यात आले आहे.00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा