अनु. जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजना यंत्र, अवजारांसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

 

अनु. जाती व अनु. जमातीच्या शेतकऱ्यांसाठी योजना

यंत्र, अवजारांसाठी महाडीबीटीवर अर्ज करण्याचे आवाहन

अकोला, दि. ११ : राज्यात केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान ,राष्ट्रीय कृषि विकास योजना कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प या योजना महाडीबीटी पोर्टलवर राबविल्या जात आहेत.

 

महाडीबीटी प्रणालीवर ट्रँक्टर चलित औजारे,पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्र औजारे,पिक संरक्षण साधने मनुष्य व बैल चलित औजारे,प्रक्रिया युनिट.भाडे तत्वावर कृषि यंत्र व  औजारे सेवा पुरवठा केंद्राची उभारणी (CHC) औजारे  बँक,ईतर यंत्र सामुग्री करिता 50 टक्के अनुदान मर्यादा व मार्गदर्शक सुचनेनुसार जे कमी असेल ते या बाबीच्या लाभासाठी महाडीबीटी  (https://mahadbtmahait.gov.in) या वेबसाईटवर जाऊन अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

महाडीबीटी पोर्टलवरील लाभार्थी निवड सोडत लॉटरी ऐवजी प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य निवड लागू राहील असे आवाहन डॉ.मुरली इंगळे,जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, अकोला यांनी केले आहे व अधिक माहितीकरिता कृषि विभागाच्या सहायक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.  

 

 ०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन