मिशन लक्षवेध अंतर्गत मैदानी व वेटलिफ्टींग क्रीडा प्रकारासाठी

 

क्रीडा प्रशिक्षक पदाकरीता अर्जाचे आवाहन
अकोला, दि. 12 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत मिशन लक्षवेध योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. मिशन लक्षवेध योजना या माध्यमातून ऑलीम्पीक स्तरावर खेळाल्या जाणाऱ्या 12 खेळा प्रकारामध्ये लक्ष केंद्रीत करण्याचे महाराष्ट्र शासनाचे मानस आहे. जिल्ह्यातील पात्र व गुणवत्ता खेळाडूंना संबंधीत खेळामध्ये प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही केंद्रे कार्यान्वीत करण्यात येत आहे.
अकोला जिल्हयात मिशन लक्षवेध योजने अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरु करण्यात येत असून, सदर केंद्रासाठी मैदानी व वेटलिफ्टींग क्रीडा प्रकाराकरीता क्रीडा प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. बीपीएड/एमपीएड/ क्रीडा विज्ञानातील पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. 2) प्रशिक्षण पात्रतेमध्ये एनएसएनआयएस डिप्लोमा इन कोचिंग (अॅथलेटिक्स) किंवा समतुल्य अभ्यासक्रम पुर्ण केलेला असावा किंवा वर्ल्ड अॅथलेटिक्स संघटनेचा लेव्हल-1 कोर्स पुर्ण केलेला किंवा सहा आठवड्यात एनएसएनआयएस सर्टिफिकेट कोर्स (अॅथलेटिक्स) व (वेटलिफ्टींग) उत्तीर्ण केलेला उमेदवार पात्र राहिल. 3) अनुभवाबाबत उमेदवारास किमान एक वर्षाचा राज्य स्तरावरील प्रशिक्षणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धासाठी खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा अनुभव अथवा युवा खेळाडूंशी काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. 4) उमेदवाराची वयोमर्यादा किमान 21 वर्षे व कमाल 45 वर्षे अशी राहिल. 5) भाषा प्राविण्यामध्ये मराठी भाषा अनिवार्य असून इंग्रजी भाषेचे ज्ञान असणाऱ्या उमेदवारांना प्राध्यान्य दिले जाईल. 6) क्रीडा पार्श्वभुमीबाबत उमेदवार हा आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावर पदक प्राप्त खेळाडू असावा. 7) तसेच संगणक कौशल्यामध्ये खेळाडूंची प्रगती नोंद ठेवणे, अहवाल तयार करणे व डेटा ट्रॅकींग करण्यासाठी मुलभुत संगणक प्राविण्य आवश्यक आहे. 8) उमेदवाराने शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांकडून दिलेले वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल स्व.वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे दि.19 जून 2026 रोजी पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावे. जिल्ह्यातील पात्र व अनुभवी क्रीडा प्रशिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन