असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाचा शुभारंभ श्रमशक्ती सर्वेक्षणाचीही सुरूवात
असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाचा शुभारंभ
श्रमशक्ती सर्वेक्षणाचीही सुरूवात
अकोला, दि १५: जिल्ह्यातील असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक
सर्वेक्षण व नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी वर्षा मीना
यांच्या हस्ते आज झाला.
जिल्हा सांख्यिकी उपायुक्त अरविंद सुने, सांख्यिकी अधिकारी स्वाती सदांशिव यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित
होते. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील असंघटित बिगर कृषी क्षेत्रातील
उद्योगांची माहिती शास्त्रोक्त पद्धतीने संकलित केली जाणार आहे. लहान उत्पादक, व्यापारी,
सेवा प्रदाता क्षेत्रातील वाहतूक, शिक्षण, आरोग्य यांची आर्थिक व कार्यात्मक वैशिष्ट्यांचे
संकलन याद्वारे होणार आहे. त्यात हॉटेल, वाहतूक, शिक्षण, आरोग्य, अन्नप्रक्रिया, रसायने,
कापड उद्योग, शीतपेय, चर्मोद्योग, घाऊक व किरकोळ व्यापार आदी आस्थापनांचे सर्वेक्षण
मार्च २०२७ पर्यंत केले जाईल, अशी माहिती सांख्यिकी उपायुक्त श्री. सुने यांनी दिली.
केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयातर्फे संपूर्ण
देशभरात नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण राबविले जात आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महास्ट्राईड
प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील श्रमशक्ती, रोजगाराची रचना व रोजगाराची आकडेवारी गोळा
केली जाईल. नियमित वेतनधारक, स्वयंरोजगार, अनौपचारिक क्षेत्रातील कामगार यांचे प्रमाण
समजण्यास या आकडेवारीचा उपयोग होतो. राज्यातील सर्व जिल्ह्यात हे सर्वेक्षण मार्च २०२७
पर्यंत केले जाईळ.
सर्वेक्षणासाठी शास्त्रोक्त व तांत्रिक पद्धतीने निवड केलेल्या कुटुंबांची
माहिती गोळा केली जाईल. अशा कुटुंबांनी अन्वेषकाला माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी केले.
०००
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा